शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईच्या वतीने फिरते रक्तदान जनजागृती शिबीर

0

अंबाजोगाई : राष्ट्रीय स्वैच्छा रक्तदान मोहीम 2018 अंतर्गत शासकीय रक्तपेढी स्वा.रा.ति. ग्रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या वतीने अंबाजोगाई परिसरातील विविध गर्दीच्या ठिकाणी फिरते रक्तदान जनजागृती शिबीर घेवून रक्तदानाविषयी जनसामान्यामध्ये जनजागृती करण्यात आली. 1 ऑक्टोबर 1975 पासून राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान मोहीम पुर्ण भारतात राबविली जाते. या मोहीमेच्या माध्यमातून रक्तदानाविषयी सकारात्मक माहिती समाजामध्ये देण्यात येते. याचेच औचीत्य साधून शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 1 ऑक्टोबर 2018 पासून अंबाजोगाई परिसरामध्ये तसेच विविध गावे, महाविद्यालये या ठिकाणी फिरते रक्तदान जनजागृती शिबीर घेवून जनजागृती करण्यात आली.

याचाच एक भाग म्हणून आज दि.29 ऑक्टोबर रोजी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करून महाविद्यालय व रूग्णालययातील अधिकारी, कर्मचारी आणि रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी स्वा.रा.ति.ग्रा. महाविद्यालय व रूग्णालय परिसरामध्ये फिरते रक्तदारन जनजागृती शिबीर घेण्यात आले. याअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना मार्गदर्शन करुन परिपत्रके देण्यात आली अशाच प्रकारचे दुसरे शिबीर आगार प्रमुख शिवराज कराड यांच्या सहकार्याने अंबाजोगाई बसस्थानकामध्ये घेण्यात आले. या शिबीराच्या माध्यमातून बसस्थनकांमध्ये उपस्थित सर्व प्रवासी राज्य परिवहन मंडळ कमर्चारी यांना रक्तदानासाठी प्रेरीत करुन रक्तदानाविषयी माहिती देणारे पत्रके वितरित करण्यात आली. तसेत रक्तदान करण्याचे व गावोगावी रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन करण्यात आले. अशाच प्रकारचे तिसरे फिरते रक्तदान जनजागृती शिबीर आठवडी बाजार या ठिकाणी घेवून उपस्थितामध्ये रक्तदानाविषयी माहिती देण्यात आली. रुग्ण सेवेसाठी तत्परतेने पुढे येवून जे सध्या रक्तदान करत आहेत त्यांनी तीन महिन्यातून एकदा रक्तदान करावे व सोबत दुसऱ्या एका निरोगी व्यक्तीस रक्तदानासाठी प्रेरित करुन शासकिय रक्तपेढी अंबाजोगाई यांना रक्तसंकलनासाठी सहकार्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी आधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख, वैद्यकिय अधिक्षक डॉ.राकेश जाधव, डॉ.शिवाजी बिरारे, डॉ.वेदपाठक, मेट्रन भताने मॅडम, शिवराज कराड, प्रसाद पाठक उपस्थित होते. तर या कार्यक्रमास डॉ.योगेश गालफाडे डॉ.लोमटे, डॉ.विनय, डॉ.शितल, तसेच वैद्यकिय महाविद्यालय व रग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थी तसेच रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

बसस्थानकातील कार्यक्रमासाठी बसस्थानकातील प्रवाशी, परिवहन मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्ञानेश्र्वर जाधव यांनी केले. तर सुत्रसंचालन अरुन बनसोडे व बालाजी कोठुळे यांनी केले. मान्यवरांचे आभार डॉ.वैभव देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अर्जून जाधव, डॉ.शिवराज, डॉ.अभिजीत, रामदासी, मिर्झा, किरण, पवार, चव्हाण, यादव, अनवर, गव्हाणे, वाल्मीक, कुजंटवाड, यांनी सहकार्य केले.