ठाणे । शासकीय रुग्णालयाच्या खाजगीकरणाच्या विरोधात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने रुग्णालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. खाजगीकरणाचा जीआर शासनाने ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.भारतीय संविधानातील कलम 47 नुसार नागरिकांचे पोषण आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे, हे राज्याचे कर्तव्य आहे. ते योग्यप्रकारे न करता खाजगीकरण करण्याचा अत्यंत घातक निर्णय घेतल्याचा आरोप करत ही निदर्शने करण्यात आली.
पंच तारांकित रुग्णालयापासून समाज त्रस्त
विमा कंपन्या आणि खाजगी उद्योगपती यांच्या ताब्यात आरोग्य सेवा देऊन जनतेची पिळवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्य विम्याचे हप्ते, अनावश्यक तपासण्या, शस्त्रक्रिया तसेच पंच तारांकित रुग्णालयापासून समाज त्रस्त झाला आहे. लाखोंची बिले आणि रुग्णाच्या जीवाचे बाजारीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरविले असल्याची टीका देखील या निदर्शनादरम्यान करण्यात आली. रुग्णालयातील कर्मचार्यांचा आरक्षणाचा फायदा काढून घेण्याचा डाव असल्याचा आरोपदेखील यावेळी करण्यात आला.