दोंडाईचा । हस्ती चॅरीटेबलें ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल ज्यु कॉलेज दोंडाईचा येथील विध्यार्थ्यांनी रेखाकला – एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत यश संपादन केले. गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने हस्ती स्कूलचे विध्यार्थी हे इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षेस प्रविष्ट होत आहेत. विशेतः यांच्यातील ’अ’ श्रेणी प्राप्त करणार्या विध्यार्थ्यांना शाळेतर्फे चांदीचे कॉइन प्रदान करून गौरविण्यात येते.
यशस्वी विद्यार्थ्यांचा चांदीचे नाणे देऊन गौरव
यावर्षी इंटरमीजिएट परीक्षेस प्रविष्ट 66 विद्यार्थ्यांपैकी रिद्धी गाडेकर व युक्ती अग्रवाल, या विद्यार्थिनींनी ’अ’ श्रेणी पटकावली. तर मानसी छाजेड, कृतिका पवार, श्रेयांस जैन, हिमांशू रोकडे, अनिकेत उपाध्ये, जैनब हकीम, ओजस्वी मुनोत, ग्रीष्म गुजराथी व आकांशा भारस्कर या 9 विध्यार्थ्यानी ’ब’ श्रेणी प्राप्त केली. आणि 48 विध्यार्थी ’क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले. सोबतच एलिमेंटरी परीक्षेस प्रविष्ट 70 विद्यार्थ्यांपैकी 7 विध्यार्थ्यानी ’ब’ श्रेणी प्राप्त केली. यात अवनी भावसार, सुखद सोनावणे, उर्वशी देसले, अमृता पाटील, पूर्व जाधव, सुशीला गायकवाड व तेजल जैन यांचा समावेश आहे. तसेच 50 विध्यार्थानी ’क’ श्रेणी मिळवली. याशिस्वीतांचे शालेय समिती चेअरमन कैलास जैन, डॉ विजय नामजोशी तसेच प्राचार्य एस.एन.पाटील, हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना कला विभागप्रमुख मुकेश डहाळे कला शिक्षक मनोहर यादव, शिक्षिका माधुरी गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.