शासकीय वसतिगृहातील 500 अंध मुले उपाशी

0

पुणे : शासकीय वसतिगृहातील गलथान कारभाराचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. यावेळेस शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात हा प्रकार घडला असून, भोजनाअभावी पाचशे अंध मुले दोन दिवस उपाशी असल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासकीय वसतिगृहात हा प्रकार घडला. येथील मुले उपाशी असल्याचे समजताच छात्र भारती विद्यार्थी संघटनेने वसतिगृहासमोरच रिकामी ताटे आणि ग्लास वाजवत आंदोलन केले व येथील कारभाराचा निषेध केला. पुणे : शासकीय वसतिगृहातील गलथान कारभाराचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. यावेळेस शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात हा प्रकार घडला असून, भोजनाअभावी पाचशे अंध मुले दोन दिवस उपाशी असल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासकीय वसतिगृहात हा प्रकार घडला. येथील मुले उपाशी असल्याचे समजताच छात्र भारती विद्यार्थी संघटनेने वसतिगृहासमोरच रिकामी ताटे आणि ग्लास वाजवत आंदोलन केले व येथील कारभाराचा निषेध केला.

रिकामी ताटे वाजवत आंदोलन पुण्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासकीय वसतिगृहातील मेस दोन दिवसांपासून बंद असल्याने 500 मुले उपाशी असल्याची घटना रविवारी समोर आली. मेसमध्ये अन्न शिलक्क नसल्याने ही अंध मुले उपाशी असल्याचे समजताच ग्लास आणि भांडे वाजवत छात्र भारती विद्यार्थी संघटने या घटनेचा निषेध केला. अन्न मिळत नसल्याने येथील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी समाज कल्याण विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना दूरध्वनीव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, या अधिकार्‍यांनी दूरध्वनी उचलला नाही. समाज कल्याण विभागाच्या अखत्यारित हे वसतिगृह येत असून, अधिकार्‍यांची मनमानी आणि अकार्यक्षमतेचे परिणाम येथील अंध विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. या वसतिगृहात कुठल्याही सुविधा नसून, येथील गरीब विद्यार्थी अतिशय बिकट स्थितीत दिवस अक्षरशः ढकलत आहेत. वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.