नंदुरबार । राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त कार्यालय समाज कल्याण नंदुरबार यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी वसतीगृहात प्रवेश सुरू असुन प्रवेश घेवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण कार्यालय नंदुरबार अंतर्गत चालविल जाणारे गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धर्मराज नगर,करण चौफुली परिसर या ठिकाणी संपर्क साधून कार्यालयीन वेळेत वसतिगृहाचा अर्ज मोफत प्राप्त करून घ्यावा असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले आहे.
दरमहा 600 रूपये निर्वाह भत्ता
वसतिगृहातील प्रवेशित विदयार्थ्याना दोन वेळेचे पोटभर जेवण, सकाळी नास्ता, मोफत वह्या व पुस्तके तसेच शासनामार्फत दरमहा 600/- रूपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. नंदुरबार शहरात वर्ष-2003- 04 पासुन धर्मराज नगर,करण चौफुली परिसरात गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सुरू असुन या वसतिगृहात मागासवर्गीय समाजातील अनु.जाती, अनु.जमाती, आर्थिकदृष्टया मागासवर्ग, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश देण्यात येते यासाठी परिपूर्ण भरलेल्या अर्जासह शाळा सोडल्याचा दाखला,गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, वैद्यकीय दाखल्याच्या छायांकित प्रतीसह वसतिगृहात 6 जुलै,2017 पर्यत जमा करावेत असेही प्रसिध्दी पत्रकानुसार कळविण्यात आले आहे.