जळगाव : देशात कोरोना विषाणुमुळे उद्भवणार्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थतीत कोरोना या रोगाचे नियंत्रण, प्रतिबंधात्मक, आपत्कालीन उपाययोजना करण्यासंदर्भात नेमुन दिलेल्या कर्तव्यामध्ये कसुर केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. ‘दै. जनशक्ति’ने गैरहजर डॉक्टर व कर्मचार्यांबाबत काल वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये आज २५ कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.