शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर अनोळखी वृद्धाचा मृत्यू

जळगाव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सुमारे 60 ते 65 वर्षीय अनोळखी वृद्ध मयत स्थितीत आढळला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
या वृद्धास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भंगाळे यांनी जाहीर केले. अंगावर लाल रंगाचा शर्ट, पांढरा पायजमा, दाढी वाढलेली असे मयताचे वर्णन आहे. वृद्धाची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलीसांनी केले आहे. याबाबत डॉ. भंगाळे यांनी खबर दिली. त्यावरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.