शासनाचा 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प

0

शहादा । महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये वनविभाग व इतर शासकीय विभाग,तसेच लोक सहभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडायचा आहे.21 जून रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संरक्षक पियुषा जगताप यांनी केले आहे.

घराकरीता पाच,संस्थासाठी 25 रोपे
दि.25 जून ते 5 जुलै 2017 या कालावधीत रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.या कार्यक्रम अंतर्गत नंदुरबार वनविभागात शहादा ,नवापुर,नंदुरबार,मेदासी वनविभागात तळोदा,अक्कलकुवा तालुक्यात रोपवाटिकेतून हि रोपे पुरवण्यात येणार आहे .याकरिता स्थानिक कार्यालयात नोदणी करावी.प्रत्येक घराकरिता 5 रोपे व संस्थासाठी 25 रोपे देण्यात येणार आहेत.असे पत्रकार परिषदेत पियुषा जगताप यांनी सांगितले. रोपे आपल्या दारी या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे पियुषा जगताप यांनी आवाहन केले आहे.