शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवा

0

आमदार संजय सावकारे ; भुसावळ शहरात भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक

भुसावळ (प्रतिनिधी)- शासनाच्या माध्यमातून गोरगरीब लाभार्थींसाठी राबवण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे शिवाय नागरीकांच्या मनातील जीएसटीचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत केले. जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयात सोमवारी भाजपा पदाधिकार्‍यांची महत्वपुर्ण बैठक आमदार संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीपूर्वी कृषी मंत्री स्व.पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.

विकासकामांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचवा -आमदार सावकारे
आमदार सावकारे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गोरगरीब व सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी चांगले निर्णय घेण्यात आले असून निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे शिवाय विविध योजनांही सुरू करण्यात आल्या असून योजनांचा लाभ लाभार्थींना मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. इतकेच नव्हे तर राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचीही माहिती नागरीकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची असल्याचे सांगितले. बैठकीला शहर व ग्रामीण भागातील कायर्र्कर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीचे सुत्रसंचलन भालचंद्र पाटील तर प्रास्ताविक शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे तर आभार प्रशांत नरवाडे यांनी मानले.

विरोधकांना पोटदुखीचा आजार -रमण भोळे
शहरात विविध विकासकामांना सुरूवात झाल्याने विरोधकांना पोटदुखीचा आजार होत आहे. इतकेच नव्हेतर भाजपा शासनाच्या विविध विकास कामांमुळे विरोधक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.म्हणून ते जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत असल्याने प्रत्येक नागरीकांच्या घरापर्यंत पोहचून विविध कामांची माहिती द्यावी, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
बैठकीला नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक किरण कोलते, पिंटू कोठारी, मुकेश पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र नाटकर, रमेश नागराणतालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, वसंत पाटील, परीक्षीत बर्‍हाटे दिनेश नेमाडे, भालचंद्र पाटील, पवन बुंदेले, नारायण तायडे, गोलू पाटील, प्रा.प्रशांत पाटील, रवी ढगे, प्रमोद नेमाडे, प्रमोद सावकारे आदींची उपस्थिती होती.