शासनाच्या वैद्यकीय योजनांची सर्वसामन्यांना माहिती द्या

0

भुसावळ। शासनातर्फे गोरगरीब नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र ग्रामीण भागात माहिती अभावी या योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे शिवसैनिकांनी गरजूंना या योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले. तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांची भुसावळ तालुका तसेच भुसावळ शहर, वरणगाव शहर व ग्रामीण भागात आखणी केलेली होती.

मोफत आरोग्य तपासणी शिबीरात गरजूंना लाभ
तालुक्यातील कंडारी येथील हनुमान मंदिर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ नागरिकांच्या भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कोणार्क हॉस्पिटल भुसावळ तसेच नेत्रम हॉस्पिटल यांच्या सहयोगाने घेण्यात आले. जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी तालुका प्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, उप तालुका प्रमुख हिरामण पाटील, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, दर्यापुर सरपंच सुनील कोळी, विकास पाटील, प्राचार्य विनोद गायकवाड, ललित मुथा उपस्थित होते. प्रा.धिरज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्ताविक कार्यक्रमाचे संयोजक शिक्षकसेना उपजिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन गाव प्रमुख राकेश महाजन यांनी केले.
राजेश मोरे, राकेश महाजन, सुनील चौधरी, शाम झाल्टे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रसिंग पाटिल, संजय मोरे, सुरेंद्र सोनवणे, रोशन मोरे, सुहास मोरे, भूषण मोरे, राकेश मोरे, निखिल मोरे, सोनु चौधरी, प्रवीण मोरे, नितीन पाटील, प्रमोद जगताप, दीपक जगताप, दुर्गादास महाराज, गोविंदा भंगाळे, किरण तायडे, अतूल भंगाळे, हर्षल नारखेडे, सचिन पाटील, भूषण बोदर, यशवंत मोरे, रवींद्र चौव्हान, शहर पदाधिकारी बबलू बर्‍हाटे, अजय पाटील, निलेश महाजन, प्रा.धिरज पाटील, राजेश ठाकूर, निखिल सपकाळे यांनी परिश्रम घेतले. परिसरातील 358 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.