शासनाने पोट खराबा क्षेत्र 8 अ मध्ये समाविष्ट करावे : जनार्धन पांढरमिसे

0

इंदापूर : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनीच्या 7/12 ऊतार्‍यावर पोट खराबा शेर्‍याची नोंद आहे.मात्र ते क्षेत्र 8अ च्या खाते उतार्‍यावर समाविष्ट नसल्याने त्या शेतात पिके ऊभी असताना देखिल कर्ज मिळत नाही. ह्या साठी पोट खराबा क्षेत्र शेतकर्‍यांच्या 8 अ च्या उतार्‍यावर समाविष्ट करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे ग्राहक पंचायतीचे पूणे जिल्हा संघटक जनार्दन पांढरमिसे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

शेतकर्‍यांना तोटा होतो
निवेदनात म्हटले आहे की राज्यातील जवळपास सर्वच शेतकर्‍यांनी पोटखराब क्षेत्र वहीत केले आहे.व त्या वहीत जमिनीत पाईपलाईन टाकून ठिबक सिंचन योजना राबवुन जमिनी ओलिताखाली आणलेल्या आहेत.परंतु त्या क्षेत्रावर कोणत्या बँका व विकास सहकारी संस्था कर्ज देत नाहीत.शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर 10 एकर क्षेत्र आहे.ते सर्व क्षेत्र बागायत आहे.त्यावर ऊस फळबागा व इतर नगदी पिके आहेत.परंतु क्षेत्राची 8 अ च्या खातेउतार्‍यावर मात्र 7 एकराचीच नोंद आहे.बँका व संस्था कर्ज देताना 8 अ चे क्षेत्र ग्रहित धरूनच कर्ज देतात त्यामुळे शेतकर्‍यांना 7 एकरावरच कर्ज मिळते. तीन एकर क्षेत्र 8 अ उतार्‍यावर कमी असल्याने कर्ज मिळत नाही.त्यामुळे शेतकर्‍यांचा तोटा होतो.

सरकारचा महसूल बुडतो
तसेच राज्यसरकारचा शिक्षण कर व इतर प्रकारचा जमिन महसुल कर दर वर्षी कोट्यावधी रूपयांचा कर बुडत आहे.तरी राज्य सरकारने महसुल खात्याला त्वरित आदेश देवुन प्रत्येक शेतकर्‍यांच्या क्षेत्राची खात्री करून पोटखराब क्षेत्र वहीत केले आहे याची चौकशी करून त्याची नोंद 8 अ च्या खाते उतार्‍यावर करावी अशी मागणी जनार्दन पांढरमिसे यांनी केली आहे.