पाचोरा । महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री, बंजारा समाजाचे प्रेरणास्थान वसंतराव नाईक यांचा जन्म दिन असलेला 1 जुलै हा दिवस संपुर्ण राज्यभर कृषी दिन साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने 1 जुलै रोजी राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे परिपत्रक 20 मे रोजी जारी केले.
शासनाने वसंतराव नाईक यांच्या कार्याचे महत्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आरोप राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेने पत्रकाद्वारे केली आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच आंदोलनामुळे राज्यात होणार्या सर्व परिणामांना महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील असे ’राष्ट्रीय बंजारा टायगर्स’ चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.