पिंपरी । शासन आपल्या दारी या शिबिराचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग व संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कापसे लॉन्स, रहाटणी येथे महाराष्ट्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या विविध योजनांचे अर्ज वाटप व स्वीकृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, स्वाती ढोरे, आरती चौंधे, सुनिता तापकीर, सविता खुळे, सदस्य संदीप नखाते, विठ्ठल भोईर, संदीप गाडे, बिभीषण चौधरी, गोपाल माळेकर, महेश जगताप, विनोद तापकीर, चंद्रकांत भूमकर, देविदास पाटील, सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, संजय गांधी निराधार योजनेचे चिंचवड विभागाचे अध्यक्ष नरेंद्र माने आदी मान्यवर व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.