शासन योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात रावेर तहसीलदार जिल्ह्यात अव्वल

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे : रावेरला लाभार्थींना धनादेशाचे वाटप

रावेर- शासनाच्या विविध योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचविण्यात रावेरचे तहसीलदार जिल्ह्यात अव्वल असून त्यांना संजय गांधी निराधारची टीम सुद्धा मदत करीत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात धनादेश विविध गरीब गरजूपर्यंत पोहोचत असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले. तहसील कार्यालयात अर्थसहाय्य योजनेंतर्गत विविध धनादेशाचे वाटप गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी खडसे बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उद्योजक श्रीराम पाटील, उपसभापती अनिता चौधरी, जिल्हा परीषद सदस्य रंजना पाटील, कैलास सरोदे, पंचायत समिती सदस्य कविता कोळी, पी.के.महाजन, जितु पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक यशवंत दलाल, शारदा चौधरी, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, वासु नरवाडे, उमेश महाजन, गोपाळ नेमाडे, रवींद्र महाजन, वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, प्रभारी गट विकास अधिकारी हबीब तडवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी केले. या वेळी विविध लोकप्रतिनिधींच्या हस्ते तालुक्यातील 43 विधवा महिलांना 20 हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आले. जातीचे दाखले, नवीन रंगीत मतदान ओळखत्रे, वन विभागाकडून मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले.