रावेरच्या नूतन तहसीलदार उषाराणी देवगुणे ; पदभार स्वीकारला
रावेर- तहसीलदार विजयकुमार ढगे यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्या रीक्त जागेवर नाशिक येथील उषाराणी देवगुणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी त्यांनी रावेर तहसील कार्यालयात पदाची सूत्रे स्वीकारली. प्रसंगी अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी काळात होणार्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल तसेच तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासह शासन योजनांचा गरजू लाभार्थींना लाभ देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.