चाळीसगाव। शा सन हे जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. शासनाचे ध्येय धोरण हे जनतेला अनुसरुन असतात. त्यामुळे शासन व जनता यांच्यात योग्य समन्वय प्रस्थापीत झाल्या प्रश्न सुटण्यास मदत होईल असे प्रतिपादन आमदार उन्मेष पाटील यांनी केले. शुक्रवावी 23 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला रमजान ईद निम्मित आयोजित शांतता समिती सदस्यांच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. समन्वया अभावी अनेक प्रश्न निर्माण होऊन समाजात तेड निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून येत्या 3 दिवसात रमजान ईद आहे. त्या पार्शवभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी शांतता समिती सदस्यांची बैठकीची घेतली.
प्रशासनाला सुचना
तीन दिवसानंतर मुस्लीम समुदाय पवित्र रमजान सण साजरा करणार आहे. या दरम्यान प्रशासनाने आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्या यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना आमदार उन्मेश पाटील यांनी सुचना केल्या. रमजान कालावधीत विज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना, पोलीस बंदोबस्त ठेवाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाला सुचना देण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव होते. यावेळी उपअधिक्षक अरविंद पाटील, तहसीलदार कैलास देवरे, कार्यकारी अभियंता एन.के.सोनवणे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका रंजनाताई सोनवणे, प्रदीप देशमुख, राजेंद्र चौधरी, वसंत चंद्रात्रे, रमेश आबा चव्हाण, गफूर पहेलवान, अण्णा कोळी, मुराद पटेल, अल्लुद्दीन शेख, दिलावर मेंबर, संजय पाटील, सोमसिंग राजपूत, पल्लन बाबा, आनंद खरात, सदाशिव गवळी, बाप्पू अहिरे, वसंत मरसाळे, लुकमान शाह, सुरेश चौधरी, मानसिंग राजपूत, राजेंद्र गवळी, भूषण ब्राह्मणकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष
वीज वितरण कंपनीबाबत अनेकांनी तक्रारी केल्या जातात. विजेचा लपंडाव होत असल्याने कर्मचारी फोन उचलत नाही यावर कार्यकारी अभियंता एन.के सोनवणे यांनी यापुढे असे होणार नाही तालुक्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून कोणाची तक्रार असल्यास नियंत्रण कक्षांशी संपर्क साधण्याचे सांगितले. नियंत्रण कक्ष स्थापन केल्याने समस्या सुटणार आहे.