शासन सेवेत सामावुन घेणेबाबत अभ्यास समिती गठीत

0

नवापूर । माननीय लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या अमुल्य पाठिबामुळे एन.एच.एम.कंञाटी कर्मचार्‍याना शासन सेवेत सामावुन घेणे बाबत अभ्यास समिती गठीत झाल्याने अखेर यश प्राप्त झाले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचायांना शासन सेवेत समावुन घेणे बाबत कार्यरत कर्मचार्‍यामार्फत शासन सेवेत सामावुन घेणे बाबत मोठे आंदोलन उभे करण्यात आले. त्यात काळयाफिती लावुन काम करणे. एक दिवसाचा लाक्षणिक काम बंद आंदोलन मुंबई येथे आझाद मैदानावर, तसेच ग्रामस्तरावर आंदोलनात सरंपच यांना निवेदन देण्यापासुन ते खासदार,आमदार तसेच जिल्हापरिषद अध्यक्षपर्यत निवेदन देण्यात आली.

अतिदुर्गम भागात गेल्या 10 वर्षापासुन तुटपुंज्या मानधनावर
या कर्मचार्‍याच्या आंदोलनास तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्‍या नंदुरबार जिल्हयात अतिदुर्गम भागात गेल्या 10 वर्षा पासुन तुटपुंज्या मानधनावर सेवा देवुन मातामृत्यु अर्भक तसेच बालमृत्यु कमी करण्यास यश प्राप्त केले. संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण देखील वाढवुन माता व बालक यांना सुरक्षीत केले आहे. या दिलेल्या योगदानाला माजी केंद्रीय सामाजिक न्यायमंञी माणिकराव गावीत,माजी मंञी तथा आमदार सुरुपसिंग नाईक,खासदार हिना गावीत,जि.प अध्यक्षा रजनी नाईक,माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत, यांनी कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावुन घेण्याकरीता व कर्मचार्‍याच्या उज्वल भविष्यासाठी पाठपुरावा केला आहे.

5 जुन रोजी शासन निर्णय
या सर्वाच्या योगदानामुळे आज अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाया कर्मचार्‍याना शासन सेवेत सामावुन घेणे बाबत अभ्यास समिती गठित केल्याचा 5 जुन 2017 रोजी शासन निर्णय काढण्यात आला असुन हे यश वरील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामुळे प्राप्त झाले. त्यांनी याप्रमाणेच शासन सेवेत सामावुन घेई पर्यत पाठ पुरावा करावा असा विश्वास राष्ट्रीय आरोग्य अभियान कंञाटी अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केला.या बाबतची माहीती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ अध्यक्ष व सचिव यांनी दिली आहे.

यांचा होता सक्षम पाठिबा
जिल्हा परिषद कर्मचारी संघटना नंदुरबार व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना यांनी त्यांच्या मागण्यामध्ये पहिली मागणी ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचार्‍याना शासन सेवेत सामावुन घेण्याबाबत लावुन धरलेली मागणी तसेच राज्यस्तरीय जिल्हा परिषद आरोग्य संघटनेचे अधिकारी यांनी या आंदोलनास सोबत राहुन दिलेला पांठिबा तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आरोग्य सेवा देत राहिले.