नवी दिल्ली । भारतीय प्रशिक्षक यांचा वाद हा नवीन नाही. मात्र जो काही वाद होत असे ते विदेशी प्रशिक्षकाबरोबर त्यामुळे याकडे कोणीच लक्ष देत नसे. मात्र यावेळी भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी रवीशास्त्री गेल्यानंतर हा पदभार स्विकारला होता. मात्र गेल्या वर्षाभरापासून संघ त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगली कामगिरी केली होती.मात्र चॅम्पियन ट्रॉफी यांच्यातील वाद समोर आला.त्यातून अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे कुंबळेचा जागी कोण?यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.ते अर्ज पुरेश नसल्याने अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती.या मुदत वाढीत भारताचा फिरकी गोलंदाज रवी शास्त्री यांनी सुध्दा अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी सेहवाग व रवीशास्त्री याच्या टक्कर होणार मात्र कर्णधार विराट कोहली यांने रवी शास्त्रीला पसंती दिल्याचे यापुर्वी वृत्त्तापत्रामध्ये वृत्त आले आहे.
पाच जणांची नावे चर्चेत
अनिल कुंबळे आधी टीम डायरेक्टर या नात्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे रवी शास्त्रींच्याच हाती होती. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात संबंधही अतिशय उत्तम आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची शर्यत आता चुरशीची झाली आहे. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर, प्रशिक्षक म्हणून निवड होणार असेल अशी खात्री बीसीसीआय देणार असेल तरच आपण अर्ज करु असा पवित्रा शास्त्रींनी घेतल्याचे पुढे आले होते. मात्र रवी शास्त्री यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी विरेंद्र सेहवाग, दोड्डा गणेश, लालचंद राजपुत, टॉम मुडी आणि रिचर्ड पायबस अशी 5 नावं चर्चेत आहेत. त्यातच कोहली ज्या नावासाठी आग्रही होता ते रवी शास्त्रीही या पदासाठी अर्ज करणार असल्याने शास्त्रींची या पदावर निवड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुदत वाढ केली होती बीसीसीआयने
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंची मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपली. त्यांनी विंडीज दौर्यासाठी दिलेली मुदतवाढ न स्वीकारता या पदाचा नुकताच राजीनामा दिला. त्यामुळे बीसीसीआयने या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 9 जुलैपर्यंत वाढवली आहे.या मुदतवाढीचा फायदा घेऊन रवी शास्त्रीने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे नक्की केले आहे. शास्त्रीने आपला निर्णय वर्तमानपत्राकडे बोलून दाखवला आहे. या नविन प्रशिक्षक नेमणूकीबाबत आता चढाओढ सुरु झाली आहे. प्रशिक्षक निवडीसाठी सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. यात सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, व्हि.व्हि.एस. लक्ष्मण यांचा समावेश आहे.