शास्त्रीनगरात घाणीचे आगार

0

नवापुर । शास्त्री नगर भागात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशांनी आज संतप्त प्रतिक्रया व्यक्त करून या भागातील असंख्य पुरूष व महिला यांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांची भेट घेऊन शास्ञीनगर भागात झालेले घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे सांगून संतप्त भावना व्यक्त केल्या व आमच्या भागातील अस्वच्छता दुर होत नाही तो पर्यंत येथुन जाणार नाही असे म्हणत तेथेच ठिय्या मांडला.

नागरी सुविधांचा अभाव
यावेळी रहिवाशांनी आपल्या भागातील नागरी सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट सांगुन याला नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याची संतप्त प्रतिक्रया यावेळी दिल्या. तसेच शास्ञीनगर व जनतापार्क भागातील रस्त्यांची अवस्था फारच वाईट झाली असून नवीन रस्ता होण्यासाठी मागणी करूनही तो केला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. इतर भागात रस्ता डांबरीकरण करण्यात आले. माञ शास्त्रीनगर भागातील रस्ते का करण्यात आले नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येऊन आमच्या भागाकडे पाच वर्षे दुर्लक्ष करण्यात आले. वाळीत टाकले होते अशी संतप्त भावना महिलांनी बोलुन दाखवली.

गार्डनही पुर्णपणे मोडकडीस
शास्त्रीनगर भागातील एकमेव गार्डन ही पुर्णपणे मोडकडीस आले असून ते उकिरडा झाले आहे. नगरपालिकाने येथे गार्डनचे नूतनीकरण करावे अशी मागणी करण्यात आली. तसेच भाजपचे विशाल सांगळे यांनीही जनतापार्क भागातील महिलांन सोबत जाऊन कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करून रहिवाशांना मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले.पावसाळ्यात पाणीटंचाई होत असल्याची समस्या मांडली. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक शिरीष प्रजापत उपस्थित होते.

अस्वच्छतेसह इतरही समस्या
आमच्या प्रभागातील नगरसेवक व आरोग्य सभापती यांच्या दुर्लक्षामुळे आमच्या भागात अस्वच्छता व इतर समस्या निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांनी यावेळी केला. रहिवाशी महिला तावातावाने बोलत होत्या. मुख्याधिकारी शिंदे यांनी शांतपणे सर्व ऐकुन समस्या जाणून घेतल्या व लगेच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शहरातील प्रभागात झालेली अस्वच्छता व इतर समस्या यामुळे रहिवासी जोमात आणि नगरसेवक आणि नगरपालिका कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रया यावेळी भाजपचे जिल्हा महामंञी अनिल वसावे यांनी दिली.याप्रकरणी संबंधितांनी तातडीने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली.