जळगाव ।येथील नुतन मराठा महाविद्यालयातील डॉ.चंद्रशेखर बोस सभागृहात बुधवारी 15 रोजी शास्त्रीय पध्दतीने पक्षी गणना कशी करावी यावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेसाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई चे संशोधक सहाय्यक नंदकिशोर दुधे यांनी मार्गदर्शन केले. शास्त्रीय पध्दतीने पक्षी गणनेविषयी पीपीटीच्या माध्यमातुन सादरीकरण व चर्चात्मक पध्दतीने मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील मेहरुण तलावावर प्रत्यक्ष पक्षी गणना कशी करायची, गणना कार्ड कसे भरायचे याचे प्रात्यक्षीक घेण्यात आले.
मेहरूण तलावावर प्रत्यक्ष पक्षी गणनेचे प्रात्यक्षिक
कार्यशाळेत गणनेचे क्षेत्र निवडण्यासाठी गुगल अर्थ व व्हॉट्सअपचा वापर कसा करावा, ट्राझीट लाईन कशी आखावी, आखलेल्या ट्राझीट लाइनवरुन गणना कशी करावी या विषयी प्रात्यक्षीक दाखविण्यात आले. कार्यशाळेत 40 विद्यार्थी विद्यार्थींनींनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेला दुर्मिल पक्षी गिधाडाच्या पुजनाने सुरुवात करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख हेते. यावेळी पक्षी कवी श.मु.चौधरी, उपप्राचार्य आर.बी.देशमुख, पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पक्षीमित्र गाडगीळ यांनी केले.