जळगाव । ’महाराष्ट्रमिशन वन मिलियन’च्या ’अवघा महाराष्ट्र फुटबॉल’अंतर्गत संडे स्ट्रीट फुटबॉल स्पर्धा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी 9 रोजी शास्त्री टॉवर चौकात ’स्ट्रीट फुटबॉल स्पर्धा’ घेण्यात आली. यात मुले, मुली महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत एकमेकांविरोधात रस्त्यांवर गोल करण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. 29 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अंजली पाटील, एकलव्य पुरस्कारप्राप्त कांचन चौधरी, माजी महापौर भारती सोनवणे, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच मंजूषा भिडे, क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुख शेख होते. ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून, तर प्रमुख पाहुण्यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. यांच्यात झाली चुरस जळगाव इलेव्हन महिला संघातर्फे प्रा.डॉ.अनिता कोल्हे, सुनंदा पाटील, भारती पाटील, लीना झोपे, भारती सोनवणे, अंजली देशमुख, वर्षा सोनवणे, संध्या पाटील, रोशनी अहिरे, छाया कुंभार, अश्विनी कोळी जळगाव रायझिंग स्टार संघातर्फे अंजली पाटील, श्वेता कोळी, हिमाली बोरोले, कांचन चौधरी, अंजली कुलकर्णी, मंजूषा भिडे, सुनीता चौधरी, रेखा पाटील, सायली मराठे, खुशी बागुल, हर्षदा वाघ, मनीषा सावंदे यांनी सहभाग नोंदविला. ’उत्कृष्टखेळाडू’ म्हणून लीना झोपे, भारती माळी, अंजली पाटील, श्वेता कोळी, मोहिनी कोळी, नूतन शेवाळे, हर्षदा बिर्हाडे, सुवर्णा निकम, नंदिनी कापसे, तनुजा सोनवणे, सुनीता सारस्वत, मनीषा सावंदे, भारत पाटील, अजय गोसावी, किशोर मराठे, अनिमेष वानखेडे ठरले. विजयी संघांना वाहतूक शाखेचे संजय मराठे, मुख्तार पठाण, योगेश सपकाळे, किरण पाटील, क्रीडाधिकारी अरविंद खांडेकर, रेखा पाटील, राजेश जवाहरानी, युनूस अली यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.