भुसावळ। राज्यभरात जलयुक्त शिवार योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामुळे भूजलपातळीत काही प्रमाणात वाढ देखील झाली असल्याचे दिसून येते. मात्र याची अंमलबजावणी हि शास्त्रोक्तदृष्ट्या व लोकसहभागातून होण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे शिवार भविष्यात मिळू घातलेले पाणी समन्यायी पध्दतीने मिळण्याचा अभाव, पाणी संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती झालेली नाही, शिवार परिसरातील डेकून ट्रॅप बेसॉल्ट सारख्या अग्नीजन्य कठीण खडकात पाणी साठवूण ठेवण्याची क्षमता निर्माण होणे व त्यामुळे भुजल पातळी वर्षभर व्यवस्थितरित्या टिकणे कठिण असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शहरातील पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांनी सर्वेक्षण केले असून यातून हि परिस्थिती समोर आली आहे.
ठेकेदारांसोबत स्थानिकांचाही स्वयंस्फूर्त सहभाग हवा
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील जेष्ठ पर्यावरण अभ्यासक व इंडियन वॉटर वर्क्स असोिएशनचे सदस्य सुरेंद्र चैधरी, बॉम्बे नॅररल हिस्यरी सोसायटीचे सदस्य व पर्यावरण अभ्यासक मिलींद भारंबे, वत्सल ऊर्जा आश्रमाचे संचालक संजिव पाटील यांनी किन्ही परिसरातील जलयुक्त शिवाय या उपक्रमाच्या संबंधीत कार्याचा आढावा घेऊन सेर्वेक्षण केले. यात परिसरातील शेतकरी त्यांच्या अपेक्षा व जनतेचा कानोसा घेतला असता असे जाणवले की, जलयुक्त शिवार योजना काळानुसार अत्यंत गरजेची व पर्यावरण संतुलनासाठी उपयोगी पडेल. यात वादच नाही. परंतु यात कार्य करणार्या बाहेरील ठेकेदारांसोबत स्थानिकांचाही मोठा व स्वयंस्फूर्त सहभाग हवाच आहे.
पाण्याचे समन्यायी वितरण
स्थानिकांमध्ये याबाबत जलजागृती करुन तसेच भूजल कायदेसुध्दा व्यवस्थितरित्या पाळण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने अंमलात आणण्याची गरज असल्याचे या सर्वेक्षणात जाणविले. अन्यथा दैवाने दिले परंतु कर्माचेन घालविले असे होऊ नये. जेणेकरुन जलयुक्त शिवार योजनेमुळे शिवार भविष्यात मिळू घातलेले पाणी समन्यायी पध्दतीने सर्वांना मिळावे, पाणी संवर्धनाबाबत लाभार्थ्यांमध्ये जाणीव जागृती न झाल्यामुळे शिवार परिसरातील डेकून ट्रॅप बेसॉल्ट सारख्या अग्नीजन्य कठीण खडकात, पाणी साठवूण ठेवण्याची क्षमता निर्माण होणे व त्यामुळे भुजल पातळी वर्षभर व्यवस्थितरित्या टिकणे कठिण आहे.
जलपुरुष राजेंद्रसिंह यांचे घेतले मार्गदर्शन
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा आयोजित जलपरिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह, जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे, पोपटराव पवार यांच्याशी अभियंता सुरेंद्र चौधरी व मिलींद भारंबे यांनी चर्चा करुन त्यांचे मत जाणून घेतले. तसेच या योजनेत जलसाक्षरता, लोहसहभाग, योजना आखण्यापूर्वी गावकर्यांशी सल्लामसलत, योजनेची पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा सहभाग असावा अन्यथा जलयुक्त शिवार योजना फक्त आणि फक्त शासनाच्या व ठेकेदारांचाच कार्यक्रम ठरुन त्याबद्दल सामान्यजनांना व शेतकर्यांना आत्मीयता वाटणे शक्यच नाही. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कार्यास अपेक्षित फळ येणार नाही कारण परिसरातील प्रत्येक व्यक्तीने जलसंवर्धनाच्या चळवळीत भाग घेतल्याशिवाय ती यशस्वी होणे, डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट सारख्या कठीण दगडात पाणी मुरणे शक्य होणार नाही. जलजागृती न झाल्यास आता आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर व खोलवर विंधनविहीरी होऊन मोठ्या प्रमाणावर मुरलेले पाणी सुध्दा कमीच पडले व जलयुक्त शिवार काही दिवसातच पुन्हा जलमुक्त शिवार होऊ शकते. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे गरजेचे आहे. यातून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन राज्याच्या सिंचन क्षेत्रातही वाढ होईल व हे पाणी शेतीसाठी संरक्षित व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे अगत्याचे ठरेल. यासाठी गावपातळीवर पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेण्यात येऊन अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे हा यामागील हेतू आहे. यासाठी जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे आवश्यक आहे.
प्रतिनिधीक स्वरुपात किन्ही येथील जलयुक्त शिवाराच्या कामाचे सर्वेक्षण व निवड केली होती. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लोकसहभाग नसणे तसेच कठीण खडकामुळे पाणी जमिनीत झिरपण्यास अडचण येणे या बाबाी जाणवल्या, थोड्या फार फरकाने सर्वेक्षणाचे जे निष्कर्ष जाणवले तसेच जिल्हाभरातून निघण्याची शक्यता आहे.
सुरेंद्र चौधरी, पर्यावरण अभ्यासक