शाहरुखच्या वेब सिरीजमध्ये ‘या’ अभिनेत्याची वर्णी!

0

मुंबई : सध्या वेब सेरीजचा ट्रेंड चालू आहे. ‘नेटफ्लिक्स’ या प्रसिद्ध ऑनलाईन व्यासपीठावर भारतीय वेब सीरीजला भरपूर पसंती मिळत आहे. सैफ अली खानची ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज प्रचंड गाजली. आता यानंतर बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखची वेब सिरीज लवकरच प्र्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘बार्ड ऑफ ब्लड’ असे शाहरुखच्या वेब सिरीजचे नाव आहे. नेटफ्लिक्सची भारतातील ही तिसरी मूळ वेब सिरीज असणार आहे. या सिरीजमधून अभिनेता इम्रान हाश्मी वेब विश्वात पाऊल टाकत आहे.

रेड चिलीज इंटरटेन्मेंटचे गौरव वर्मा यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती देत लिहिले, आज खूप महत्वाचा दिवस आहे. १८ महिन्यांच्या परिश्रमानंतर आजपासून शूटिंगला सुरुवात झाली आहे. या प्रवासात इम्रान हाश्मी, विनीत सिंग, किर्ती कुल्हारी, रिभू दास गुप्ता, शोभिता हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सीरिज बिलाल सिद्दीकी यांच्या ‘द बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. या बहुभाषिक सीरिजमध्ये कबीर आनंद या बहिष्कृत गुप्तचराची कथा साकारण्यात येणार आहे.