मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची सख्खी चुलत बहिण नूरजहाँ ही पाकिस्तानच्या पेशावरमधून निवडणूक लढवणार आहे. ती पाकिस्तानात राहते आणि शाहरुखच्या अतिशय जवळची आहे. खैबर पख्तुनवा विधानसभा मतदारसंघातून नूरजहाँ आवामी नॅशनल पार्टीकडून निवडणूक लढवणार आहेत. खान अब्दुल गफार खान यांचे पुत्र अब्दुल वाणी खान यांनी ह्या पक्षाची स्थापना केली आहे.
महिला सबलीकरणासाठी मला काम करायचे आहे. माझ्या मतदारसंघात मी या विषयावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला आशा आहे की, येथील नागरिक माझ्याही पाठीशी राहतील असे नूरजहाँने सांगितले आहे.