‘शाहरुख खान’च्या दुकानात चोरी…!

0

रावेर: रावेर शहरातील मदिना कॉलनीत असलेल्या शाहरुख खानच्या किराणा दुकानातुन किराणा सामानाची चोरी झाल्याची घटाना नुकतीच घडली आहे. याबाबत रावेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की रावेर शहरातील मदीना कॉलनीत शाहरुख खान यांची किराणा दुकान आहे. ८ जूनच्या रात्री तीन-ते-चार अज्ञात चोरट्यानी सुमारे ५ हजार ४२० रुपयाचा जिवनावश्यक वस्तुचा लागणारा किराणा माल चोरुन नेला आहे. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महेंद्र सूरवाडे करीत आहे.

असा आहे चोरुन नेलेला मुद्देमाल

अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेल्या मालामध्ये ४५० रुपये किमतीचे पॅराशुट तेल, ३०० रुपयाचे व्हिल साबन, १५० कीमतीचे बिस्किट, १२०० रुपयाचे बीडी, १५० रुपयाचा शेव-चिवडा, १०० रुपये कीमतीचा आम-आचार, ७० रुपयाचा आग्रा पेठा मिठाई, ३००० रोख असा ५ हजार ४२० रुपयाचा जिवनावश्यल वस्तु चोरुन नेला आहे.