शाहरुख सोबत काम करण्यास स्वरा तयार नाही

0

मुंबई : बॉलीवूडचा बादशाह आणि ‘राहुल’ या नावांने प्रसिद्ध होणारा अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत काम करण्याची संधी प्रत्येक अभिनेत्री शोधत असते. मात्र एक अशी अभिनेत्री आहे जी शाहरुख सोबत काम करण्यास तयार नाही. स्वरा भास्करने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला आहे.

स्वरा तिच्या रोखठोक वक्तव्यामुळे आणि अभिनयामुळे ओळखली जाते. शाहरुखच्या एका चित्रपटासाठी स्वराला विचारणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये स्वराला शाहरुखच्या बहिणीची भूमिका वठवायची होती. मात्र बहिणीची भूमिका मिळणार असल्याचं ऐकताच स्वराने स्पष्ट शब्दात नकार दिला.

‘माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी शाहरुख एक आहे. त्यामुळे जर त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली तर मला प्रमुख भूमिका किंवा त्याची अभिनेत्री व्हायला आवडेल. त्याची बहीण होण्याचा विचार मी कधी स्वप्नातही करु शकत नाही. त्यामुळे या चित्रपटात मी बहिणीची भूमिका साकारु शकणार नाही’, असं म्हणत स्वराने या चित्रपटात झळकण्यास नकार दिला.