शाहरूख सध्या आपल्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात व्यस्त आहे. आतापर्यंत या चित्रपटाची चार गाणी रिलीज करण्यात आली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंतीही दिली आहे. गुरूवारी शाहरूखने पंजाबमधील जालंधर येथे चित्रपटाचे बटरफ्लाई हे चौथे गाणे रिलीज केले. यानंतर शुक्रवारी शाहरूखने राजस्थान गाठले. येथे जोधपूर आणि जयपूर मध्ये शाहरूख थांबला. ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात शाहरूख एक आंतरराष्ट्रीय टुरिस्ट गाईड बनला आहे. परंतु, जोधपूरमध्ये पोहचलेल्या शाहरुखबरोबर काही असे झाले की, तो अचनाक आता रियलमध्ये टुरिस्ट गाईड बनला आहे. झाले असे की, जोधपूर पोहचल्यानंतर शाहरुखला तेथील टुरिस्ट गाईड असोसिएशनने आपले ऑनररी सदस्य बनवले आहे.
यावेळी शाहरुख खानचे जोधपुरी स्टाइलमध्ये स्वागत करण्यात आले. जोधपुरी पगडी त्याच्या डोक्यावर घालण्यात आली. शाहरुखने जोधपुरी पगडी घातलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शाहरुखने हे फोटो शेयर करताना लिहले की, ‘मां मां मी गाईड बनलो आहे…’ (मानद) हॅरीला आपल्या परिवाराचा एक भाग बनवल्याबद्दल जोधपूर टुरिस्ट गाईड असोसिएशनचे आभार. यावेळी काही वेळ शाहरूख जोधपूरमध्येच थांबला. जालंधरमध्ये बटरफ्लाई गाणे रिलीज करण्यात आले. यावेळी चित्रपटाची अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित नव्हती. अनुष्का आईफा अॅवॉर्ड्ससाठी न्यूयॉर्कमध्ये रवाना झाली आहे. जब हॅरी मेट सेजल आतापर्यंतच्या गाण्यात आणि चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण शाहरुखला इश्कबाज टूर गाईड हॅरीच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु, आता बटरफ्लाई गाण्यात शाहरुख पूर्णपणे वेगळ्या अंदाजमध्ये दिसत आहे. युरोपच्या टूर गाईडच्या इमेजला पुसत शाहरुख बटरफ्लाईमध्ये पंजाबी मुंडा बनून भांगडा करताना दिसत आहे.