शाहिदने सोडला इम्तियाज अलीचा सिनेमा

0

मुंबई – शाहिद आणि इम्तियाजची जोडी ‘जब वी मेट’ या सिनेमातून दिसून आली होती. मात्र आता शाहिद कपूर इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात काम करणार नाही असे म्हटले जात आहे. ‘जब वी मेट’ ला रिलीज होऊन दहा वर्ष झाली आहे. दरम्यान आता पुन्हा दोघांना एकत्र बघण्याची त्यांच्या फॅन्सची इच्छा होती. मात्र ही इच्छा अपूर्ण राहणार आहे.

इम्तियाज सिनेमाचे शूटिंग सुरु करु शकला नाही कारण त्याला निर्माता मिळाला नाही. या कारणाने शाहिद कपूरने स्वत:ला या सिनेमापासून वेगळे केले. त्यामुळे शाहिदने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला.

आगामी काळात शाहिद कपूर ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. यात शाहिदसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहिदला हे वर्ष खूप लकी ठरल्याचे बोलले जाते.