मुंबई – शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांनी नुकताच दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. या जोडप्याने आपल्या नवजात मुलाचे नाव झेन कपूर असे ठेवले आहे. या दोघांनी मुलाचे नाव झेन का ठेवले याचा खुलासा शाहिदची आई नीलिमा अजीमने केला आहे.
‘शाहिद आणि मीराने ठरविले होते की जर मुलीचा जन्म झाला तर नाव मीशा असणार आणि मुलगा झाला की झेन ठेवणार. मला वाटतच होते की यावेळेला दोघांना मुलगा होणार. मी शाहिदला ४ नावे सुचविले होते. शाहिद, ईशान, झेन आणि कामरान. यामधून आम्ही झेन नाव ठेवायचे ठरविले. आता माझा मुलगा शाहिदचे कुटुंब पूर्ण झाले आहे. असे नीलिमा यांनी सांगितले.