शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिव गावात दाखल

0

शिंदखेडा । शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिव आपल्या जन्मभूमी खलाने गावी आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास येऊन पोहचले. त्यांच्या कुटुंबीयांसह गावकर्‍यांनी व जिल्हाभरातील अंत्यविधीला जमलेल्या लोकांनी दर्शन घेतले. दरम्यान शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक एम.राम.कुमार, प्रांताधिकारी गणेश मिसाळ आदी उपस्थित होते.