जैताणे । येथे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळ शाखा साक्री यांच्यावतीने जनजागृतीपर पालखी मिरवणूक काढण्यात आली. पुरूषांच्या हाती टाळ, विणा, मृदूंग तर महिला भाविकांच्या डोक्यावर पवित्र तुळशी, हातात बेटी बचाओ, बेटी पढाओ, कुटूंब लहान सुख महान, झाडे लावा झाडे जगवा, शिकाल तर टिकाल, दारूत रंगला संसार भंगला आदी जनजागृतीपर फलक हातात घेतले होते.
योजनांसाठी कलावंतांच्या वयाची अट शिथिल करण्याची मागणी
पालखी मिरवणूक संत सावता महाराज मंदिराच्या प्रांगणात आल्यावर तेथे मिरवणूकीत सहभागींनी रिंगण घातले. पोतराजच्या भूमिकेतील कलावंताने समाजिक समस्यांवर भारूडाच्या माध्यमातून गार्हाणे मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहारी कलावंत, वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप यांनी समस्या मांडल्या. त्यांच्या प्रमुख मागण्यांत वृद्ध कलावंतांना किमान 2500 रूपये मानधन देण्याचे यावे, वयाची अट शिथील करून चाळीस वर्ष करण्यात यावी यासोबत जिल्ह्यातून कमीत कमी तीनशे कलावंतांना मानधन देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मंडळाच्या प्रदेश महासचिव शोभा खैरनार, जैताणे, निजामपूर व पंचक्रोशीतील वारकरी, भजनी मंडळ, गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.