धुळे । अखिल भारतीय मराठी शाहिर परिषद ता. साक्री व जिल्ह्यांतील शाहिर कलावंत, साहित्यिक , कवी , लेखक, तमाशा कलावंत, वारकारी संप्रदाय(भजनी मंडळ), एकतारी, भारूड, लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, आराधी, टिंग्रीवाला व सर्व स्थानिक सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंताचे विविध प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पंचायत समिती साक्री येथे एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात जिल्हा शाहिर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहिर गंभीरराव बोरसे, आप्पाजी खताळ, श्रावण वाणी, भटू गिरमकर, माणिकराव शिंदे, मंडाताई माळी, शोभाताई खैरनार, शंकरराव पवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील कलावंत, शाहिर परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह 400 कलावंत उपस्थित होते. सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत आंदोलन दरम्यान भजन, किर्तन, गवळण, अभंग, लोकगिते आदी लोककला सादर करून मागण्या मांडण्यात आल्या. यानंतर दुपारी 3 वाजता गटविकास अधिकारी यांनी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
आंदोलनात सहभागी कलावंत
आंदोलनात तालुका अध्यक्ष अनिल जगताप, नानाभाऊ वाघ, ताराचंद गवळे, वसंत कुंवर, खंडू वानखेडे, इंदुबाई महाले, भास्कर चिंचोले, आसाराम अहिरे, नथ्थु साळुंके, हिलाल शेवाळे, काशिनाथ गवळे, पोपट चौधरी, फुला गवळे, आनंदा सोनवणे, निंबा चौंधरी, अमृत कुंवर, गरबड पवार, रविंद्र पाटील, जगन मोरे, पांडुरंग गवळे, प्रभाकर मोरे, दिपली गवळे, आनंदा सोनवणे, पितांबर मोरे, विष्णु शिंदे, अक्काबाई शेवाळे, बारकू भामरे, देवकाबाई गवळे, सुनंदाबाई निकुंभ, पुंडलिक बागुल, गंगाराम गवळे, पंडीत बोढरे, रत्नाकर शेवाळे, कमलबाई जाधव, लताबाई शेवाळे, सतिष गवळे आदींनी सहभाग घेतला.