शाहीर शिवाजीराव पाटील यांचा सत्कार

0

नगरदेवळा । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने जळगाव येथे छत्रपती शाहू महाराज जन्म शताब्दी पंधरवाडा साजरा करण्यात आला. यात नगरदेवळा जि. जळगाव येथील शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी यांनी शाहू महाराज पोवाडा सादर केला.

यावेळी शाहीर शिवाजीराव पाटील यांचा पारितोषीक प्रदान करतांना माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन, सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले, राज्यमंत्री ना.दिलीप कांबळे, आमदार संजय सावकारे आदी.