शाहुनगरात महिलेची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव। शहरातील शाहुनगरमधील महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाहुनगरमधील रहिवाशी महिला जयश्री गोंविद शेळके वय 36 हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी डॉ. भंगाळे यांच्या खबरीवरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ. प्रदीप बडगुजर करीत आहे.