जळगाव । भाजीपाला विके्रत्याच्या गाडीसमोरच महिलेने पापडाचे दुकान लावल्याने विके्रत्याने महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली. यानंतर विके्रत्यास समजविण्यास गेलेल्या महिलेच्या मुलास देखील विक्रेत्याने शिवीगाळ करून वाद घातला आणि जवळच असलेले लोखंडी रॉडने युवकाला मारहाण करत डोके फोडले. ही घटना 11.15 वाजेच्या सुमारास शाहुनगरात घडली असून याप्रकरणी युवकाने शहर पोलिस ठाण्यात भाजीपाला विके्रत्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
भाजीपाला विके्रत्याने घातला वाद
शाहुनगरातील मुमताज बी शेख रहिम यांनी नुकतेच दोन दिवसापासून पापड विक्रीचा छोटासा व्यावसाय सुरू केला असून आज बुधवारी देखील शाहुनगरात त्या छोटेसे दुकान लावून पापड विक्री करीत होत्या. त्याच दरम्यान, भाजीपाला विके्रता सादीक शेख हा मुमताज बी यांच्याकडे येवून माझ्या गाडीसमोर दुकान का लावतात असे जाब विचारून वाद घालत मुमताब बी यांना शिवीगाळ करू लागला. हा प्रकार पाहिल्यानंतर मुमताज बी यांच्या मुलगी शाहीन हिने नुतन मराठा महाविद्यालयाजवळ बांधकाम साईडवर काम करीत असलेल्या भाऊ अरबाज याच्याकडे पळत येत आईला भाजीपाला विक्रेता शिवीगाळ करीत असल्याचे सांंगितले.
लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण
यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास अरबाज हा सादीक शेख यांच्याकडे आल्यानंतर समजविण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, भाजीपाला विक्रेत्याने त्याच्याशीही वाद घालून शिवीगाळ करण्यात सुरूवात केली. हेच नव्हे तर चक्क जवळ असलेला लोखंडी रॉडने अरबाजला मारहाण करून त्याचे डोके फोडले. त्यानंतर अरबाजला कुटूंबियांनी तातडीने रूग्णालयात उपचारार्थ नेले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर मुमताज बी व मुलगा अरबाज यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत भाजीपाला विक्रेता यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार भाजीपाला विके्रता सादीक शेख यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी युवकावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.