जळगाव । शहरातील अनाधिकृत शाहू नगर भागातील तपस्वी हनुमान मंदिर ते पिंप्राळा रोड भागात गटारींवरी अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार महापौर व आरोग्य विभागाकडून अतिक्रमण विभागाकडे आली होती. शाहूनगर भागातील तपस्वी हनुमान मंदीर ते जळकी मील पर्यंत असलेल्या गटारींवर तेथील रहिवाशांनी शौचालय, बाथरूम, स्लॅप, जिने असे बांधकाम करून अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणामुळे येथील गटारींमधील घाण काढण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत असे. गटारींमध्ये घाण साजवून त्या भरून वाहत असल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यांवर येत होते. यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या भागातील काही रहिवाशांनी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. आलेल्या तक्रांरीची गांर्भीयाने दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून शाहूनगरातील गटारींवरील अतिक्रमण काढण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले आहे.
गटारींवरील अनाधिकृत बांधकाम पाडले
सकाळी 10.30 वाजेपासून अतिक्रमण काढायला सुरूवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत अतिक्रमण काढण्यात येवून 20 शौचालय, बाथरूमचे अतिक्रमण काढण्यात आले. मोठा असल्याने मंगळवार व बुधवार असे दोन दिवस येथील गटारींवरील अतिक्रमण काढायला लागेल, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे अधिक्षक एच.एम.खान यांनी दिली. शाहूनगरातील तपस्वी हनुमान मंदीर ते जळकी मील पर्यंतच्या कोपजयापर्यंत असलेल्या गटारींवर रहिवाशांनी शौचालय, बाथरूम, स्लॅप, जिने असे बांधकाम करून रोडावर 15 फुटांपर्यंत अतिक्रमण केले होते. याबाबत या भागातील रहिवाशांनी तक्रारी केल्या असता मंगळवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून रोडाच्या डाव्या बाजूच्या गटारींवरील अतिक्रमित बांधकाम पाडण्यात आले. मंगळवारी सायंकाळ पर्यंत 20 बांधकामे पाडण्यात आली होती. बुधवारी या भागातील उजव्या बाजूकडील अनाधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती अधिक्षक एच.एम. खान यांनी दिली. शाहूनगर येथील गटारींवरील अतिक्रमित बांधकाम पाडतांना कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नाही. येथील नागरिकांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाजयांना चांगल्या पध्दतीने सहकार्य केल्याची माहितीही अतिक्रमण विभागाचे अधिक्षक एच.एम.खान यांनी दिली. अतिक्रमण विभागाकडे अनाधिकृत अतिक्रमणाबाबत तक्रार आल्यास त्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात येवून अतिक्रमण काढण्यात येत असते. यापुढेही आलेल्या तक्रारीची त्वरीत घेवून कारवाईत सातत्य ठवले जाईल, असेही अधिक्षक एच. एम. खान यांनी सांगतिले.