कुलूपबंद घर फोडून 15 हजाराचा ऐवज लांबविला
जळगाव- एका गल्लीत राहत असलेल्या भावाकडे झोपण्यासाठी गेलेल्या रंगकाम करणार्या कामगाराच्या घरातून चोरट्याने 11 हजार 500 रुपये रोख, गॅस हंडी तसेच कपडे असलेली बॅग असा 15 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे.
शाहू नगरात शकील नामदार तडवी वय 30 हे पत्नी रसूल व मुले जुया व जुनेद यांच्यासह वास्तव्यास आहेत. 28 ऑक्टोबर रोजी शकील भडगाव तर पत्नी व मुले चोपडा तालुक्यातील पंचक येथे गेले. भडगावहून शकील 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता परतले. घरी गेले व पुन्हा कुलूप बंद करुन गल्लीत राहत असलेला भाऊ जुबेरकडे झोपयाला गेले. सकाळी 8 वाजता घरी परतल्यावर दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. घरात पाहणी केल्यावर घरातील कोठीत ठेवलेले 11 हजार रुपये रोख तसेच गॅसची हंडी असा असा ऐवज लांबविले असल्याचे लक्षात आले. त्यांनी तक्रारीसाठी शहर पोलीस स्टेशन गाठले. याठिकाणी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.