शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य आजच्या पिढीसाठी आदर्श

0

भुसावळ । राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी भरीव मदत केली. त्यांनी कुठलीही जाती भेद न मानता गोरगरीब, उपेक्षित व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले असून त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्श असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार यांनी केले.

कुर्‍हे पानाचे येथे शाहू महाराजांना अभिवादन
कुर्‍हे पानाचे येथे राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष टि.एस. बावस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, व्ही.डी. पाटील, सचिव साहेबराव पाटील, जेष्ठ संचालक डि.एस. पाटील, डि.एम. घुले, दोडके, विजय शितोळे, अशोक चौधरी, सुभाष पाटील, गोपाळ बरकले, सरपंच अण्णा शिंदे, राजाराम शिंदे, डॉ.भरत कळसकर, महेंद्र बावस्कर, संजय पाटील, रवी बरकले, बापू पाटील, भाऊराव पाटील, गणेश बावस्कर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा अध्यक्ष प्रकाश चौधरी व सचिव साहेबराव चौधरी यांनी घेतला. सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर घुले यांनी तर आभार साहेबराव पाटील यांनी मानले. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानची कुर्‍हे पानाचे उपशाखा स्थापन करण्यात आली. उपशाखा अध्यक्षपदी संजय शामराव पाटील, डॉ.भरत कालिदास कळसकर, उपाध्यक्ष श्रीकांत दिलीप बरकले, सचिव गिरीश संजय पवार, सुरेश शिंदे, सुरेश धांडे, संतोश बाविस्कर, डॉ.रमाकांत पाटील, डॉ.योगेश महाजन, सुभाष पाटील, भागवत टोंगळे, सल्लागार गोपाळ नामदेव बरकले अशी निवड करण्यात आली.