नेरुळ । रबाळे येथील शाहू महाराज विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मानव संसाधन मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने दिला जाणार स्वच्छ विद्यालय पुरस्कार शाहू विद्यालयाला मिळाला आहे.यासाठी भारतातून 170 शाळा निवडण्यात आल्या होत्या. त्यातील महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातून आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यलयाची निवड करण्यात आली. 1 सप्टेंबर रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन ऑडिटोरिम येस पी कॉलनी येथे 50 हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन प्रकाश जावडेकर केंद्रीय मानव संसाधन मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व विध्यार्थी यांचा गौरव दिल्ली येथे होणार आहे महापौर सुधाकर सोनवणे यांचे यासाठी कौतुक होत आहेत. सोनावणे यांचा शिक्षणाप्रति असणारा सकरात्मक दृष्टिकोन, त्यांचे मिळणारे प्रोत्सहान व त्यांची दूरदृष्टी आहे म्हणून शाळेची प्रगती सध्य झाली आहे.शाळेत असलेली रेन हार्वेस्टिंग योजना,कंपोस्ट खत प्रकल्प, इको टॉयलेट, सुंदर बगीचा,मुलींसाठी सॅनिटरी मशीन, मुलांना स्वच्छ मुबलक प्रमाणात केलेली पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय सर्व गोष्टी सुधाकर सोनावणे यांनी दूरदृष्टी ठेवून या सुखसुविधा गोरगरिबांच्या मुलांना मिळाव्यात या अनुषंगाने केलेल्या आहेत.
महापौरांनी केले कौतुक
शाळेतील वर्ग मंत्री मंडळ, व्हरांडा, हॉल, विध्यार्थी आरोग्य व स्वच्छता,दस्तबिन, मुलींचे आरोग्य व सुरक्षितता, समुपदेशन, सह शालेय उपक्रम, क्रीडा स्पर्धेसाठीचे भव्य मैदान, शिक्षक ,विध्यार्थी स्वच्छता व शिस्तबद्धता या सर्व बाबींचे परीक्षण देेखील करण्यात आलेल होते. महापौर सुधाकर सोनावणे यांच्या बरोबरच नगरसेविका रंजना सोनवणे व डॉ.गौतमी सोनवणे यांचे कौतुक होत आहे.