शिंगावे येथील ग्रामसेवकला शिवीगाळ ; गुन्हा दाखल

0

शिरपूर । तालुक्यातील शिंगावे येथील ग्राम सेवकाच्या अंगावर धावून जात एकाने शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवार 31 रोजी सायंकाळी ग्राम पंचायत कार्यालयाजवळ घडली. तालुक्यातील शिंगावे येथील ग्राम सेवक रविंद्र काशिनाथ पाटील हे ग्राम पंचायत कार्यालयात बसलेले असतांना गावातील मिलिंद आनंदा निकम याने संत गाडगे बाबा पुरस्कारा संदर्भात माहिती मिळण्यासाठी माहिती अधिकार कायदाअंतर्गत अर्ज केला होता. या अर्जाची माहिती केव्हा मिळेल या संदर्भात ग्राम सेवकांकडे विचारणा केली असता त्यांनी निकम यांना सदर माहिती 30 दिवसांत मिळेल असे सांगितले याचा निकम याला राग आल्याने ते ग्राम सेवकाला शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. या बाबत ग्रामसेवक पाटील यांनी निकम यांच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.