शिंदखेडाच्या मराठा युवक मंडळातर्फे अन्नदान

0

शिंदखेडा: शिंदखेडा शहरातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शिंदखेडा अमरधाम जवळील मजूर, शेतमजूर, बांधकाम व्यवसायातील मजूर तसेच अमरधाम जवळील नवीन भिलाटी वस्तीत अन्नदान करून संचार बंदीत आधार दिला. निमित्त होते शिंदखेडा येथील मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुनील मराठे यांचा वाढदिवसाचे. प्रसंगी मराठा समाजाचे अखिल भारतीय संचालक यादव मराठे, विनायक पवार, दीपक चौधरी,तुषारगुरव,दिनेश मराठे, विवेक भोई संदीप मराठे उपस्थित होते .
 

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात व महाराष्ट्रात संचारबंदी आहे त्यामुळे मोलमजुरी करणारे मजूर गरीब जनतेची उपासमार होत आहे अद्याप जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अन्नदाना संदर्भात कोणतीही मदत पोहोचलेली नाही. शहरातील काही संस्थांचे, पक्षाचे कार्यकर्ते, वस्त्या कॉलनी आदिवासी वस्तीत गरजू नागरिकांना स्वयंस्फूर्तीने मदत करीत आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता या सामाजिक कार्यकर्त्यांची मदत अपुरी पडत आहे. हीच बाब लक्षात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जागेवर जाऊन खिचडी, पिण्याचे पाणी, मास्क, बिस्किटे, आवश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. संचारबंदीत कर्तव्य बजावत असणारे पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी यांना कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन बिस्किटे व नाश्ता वाटप करण्यात आले.