शिंदखेडा । शिंदखेडा येथील रेल्वेस्थानकावर नवजीवन जलदगाडीला थांबा मिळाला असून येत्या शनिवारी दिनांक 10 मार्च पासुन ही गाडी थांबणार आहे. भारताचे स्वंरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी भ्रमणध्वनीने ही बातमी भाजपा उपाध्यक्ष गोविंद प्रकाश मराठे यांनी मंगळवारी संध्याकाळी दिली. शिंदखेडा शहर व परिसर प्रवाशी संघटना व्यापारी असोसिएशन आणि सर्व समावेशक राजकीय सामजिक प्रतिनिधीनि गेल्या 15 वर्षापासून आंदोलने करून जलदगती गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी केली होती. शेवटचा टप्यात 1 मार्च रोजी तहसीलदार कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणचा दुसर्या दिवशी 2मार्च रोजी ना. भामरे यांनी मंत्रालयाला होळी, धुलिवंदन अश्या सलग तीन दिवस सुटी आल्याने उपोषण मागे घेण्याचे विनंती केली. शिवाय सोमवारी रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून थांबा मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
स्वंरक्षण राज्यमंत्री ना. भामरे दाखविणार हिरवा झेंडा
यानुसार सोमवार 5 मार्च रोजीच नवजीवन एक्सप्रेस थांबा मिळून देण्याचे नक्की आज मंगळवार 6 मार्च रोजी संध्याकाळ ना. भामरे यांनी दूरध्वनीवरून या जलद गाडीला येत्या शनिवार पासून शिंदखेडा येथे कायमस्वरूपी थांबा मिळणार असल्याची अधिकृत माहिती दिली. या शिवाय हा थांबा माझ्याच उपस्थितीत शिंदखेडा येथे येऊन मीच हिरवी झेंडा दाखवेल असेही सांगितले. नवजीवन एक्सप्रेस व्यतिरिक्त प्रेरणा एक्सप्रेस आणि ताप्ती गंगा एक्सप्रेस गाड्यांनाही नजीकच्या भविष्यात थांबा मिळेल अशी माहिती रेल्वे विभागातून मिळाली आहे. जलदगती रेल्वे गाडीला थांबा मिळाल्याबद्दल प्रवाशी संघटना अध्यक्ष सलीम नोमनी व सर्व सहकार्यांनी फटाके फोडून आनंद उत्सव व्यक्त केला.