शिंदखेडा। तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीने मृत्यू पावलेल्या मृतांच्या दोन वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी पाठपूरावा केल्याने मिळाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत मिळाली आहे. मदतीचे धनादेश दोन्ही मृतांच्या वारसांना शुक्रवारी 25 रोजी देण्यात आले. किशोर लोटन चौधरी आणि विजय इंद्रसिंग राजपूत यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
मदतीचा धनादेश देतांना माजी आमदार रामकृष्ण पाटील, पांडुरंग माळी, मोतीलाल पाटील, रावसाहेब देसले, प्रकाश चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक पवार, कार्याध्यक्ष अशोक गिरनार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चौधरी, विनोद चौधरी, किशोर बडगुजर, ह.भ.प. देविदास महाराज भडणेकर, लोटन चौधरी आदींची उपस्थित होती.