शिंदखेडा नगरपंचायतीतर्फे शौचालयांचे लोकार्पण

0

शिंदखेडा । येथील नगरपंचायतर्फे जनता नगर येथे बांधण्यात आलेल्या 20 लाख खर्चाच्या शौचालयांचे लोकार्पण नगराध्यक्षा मथुराबाई मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, सभागृह नेते दीपक देसले,युवराज माळी,सुभाष माळी, नगरसेवक निंबा सोनवणे,तुकाराम माळी,चंद्रसिग राजपूत,रवींद्र माळी, किरणचौधरी,किरण थोरात, नामदेव भिल,उषा भिल,दीपक अहिरे भिला पाटील,राजू पहाडी,दगा माळी दत्तू माळी, भैय्या चौधरी, न्हानका गिरासे,मुन्ना माळी,राजू माळी,गणेश भिल,प्रवीण माळी,कैलास वाघ,सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते,

आज दोन्ही गटातील पदाधिकारी उपस्थित होते. जनता नगर भागात महिला व पुरुषांसाठी शौचालयची मागणी नगरसेवक निर्मला युवराज माळी, यांनी केली होती. त्यानुसार जनता नगर भागात 20 लाख रुपयांचे 20 शिटचे ,10 पुरुषसाठी व10स्त्रीया साठी ठेकेदार सेवा फाउंडेशन पुणे यांनी नगरपंचायत च्या 14 वित्त आयोगातून रु 20लाखाचे बांधून दिले त्याचे लोकार्पण करण्यात आले.