शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक; प्रारूप प्रभाग रचना जाहीर

0

शिंदखेडा । शिंदखेडा नगरपंचायत 2017 च्या दुसर्‍या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगरपंचायत प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. शिंदखेडा नगर पंचायतीची प्रारूप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे व दिनांक 20 जुलै रोजी निश्चित करण्यात आलेले सदस्य पदाचे आरक्षण सर्व नागरिकांना माहिती होण्यासाठी नगरपंचायत कार्यालय ,जिल्हाधिकारी कार्यालय धुळे संकेतस्थळ व जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यासंधार्भात हरकत/सूचना असल्यास दिनांक 31 जुलै पर्यंत नगरपंचायत कार्यालय अथवा नगरविकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दाखल कराव्यात अशी जाहीर सूचना जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका शाखा यांच्या तर्फे करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक,प्रभागांचे नाव , लोकसंख्या व आरक्षण पुढील प्रमाणे – प्रभाग क्रमांक-1- विरदेलरोड, नेताजी सुभाष नगर, जहगीरदार मळा, मांग गारुडी वस्ती, शिवाजी चौफुली, बांगला भिलाटी (1613) अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक – 2- दयाराम आबा नगर, बांगला भिलाटी, वरपाडारोड पूर्व अमाधाम, भिलाटी वरपाडारोड, विश्रामगृह आदिवासी वस्ती( 1173) -अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक 3- आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, कुंभरटेक (1384) अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रमांक 4- ,हैदरली चौक, देसाई गल्ली, तांबोळी गल्ली (1612) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक 5- रजजाक नगर, नदीपार भिलाटी ( 741) अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग क्रमांक 6- नगरपंचायत चौक, ठाणसिंग जीभाऊ चौक, तेराघर मोहल्ला, चिराग गल्ली, न्हावी गल्ली (1612) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7- बडगुजर गल्ली, बागवान गल्ली, मारुती मंदिर कासार गल्ली, देसले वाडा, गणपती मंदिर परिसर , गुरव गल्ली (1462) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 – ,गांधी चौक ,देसले वाडा, हैडल चौक, पारधी वाडा, महादेव सा मील (1475) सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक 9- निरंजन कॉपलेक्क्स, केसरानंद कॉपलेक्क्स, खरेदी विक्री संघाकडिल भाग, लक्ष्मी नारायण कॉलोनी, विवेकानंद कॉलोनी (1415) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10- बी के देसले नगर ते स्वामी समर्थ कॉलोनी, गुरुकृपा कॉलोनी,एकविरा कॉलोनी, जिजाऊ नगर (1589) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक 11- धनश्री कॉलनी, किसान कॉलनी, विजय नगर, लालचंद नगर, महावीर नगर( 1458) नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 12- सिंधी कॉलनी, विद्यासागर नगर, शिवशक्ती कॉलनी, आदर्श कॉलनी, (1579) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक 13- हस्ती बँक परिसरात, जाधव नगर, सरस्वती कॉलनी, स्टेशन रॉड भिलाटी(1505) नागरिकांचा मागास प्रवर्ग( महिला), प्रभाग क्रमांक 14- शनिमंदिर परिसर, परमार गल्ली, मारुती मंदिर परिसर, चिराग गल्ली, इम्राहीन मोहल्ला , पारधी वाडा ( 1502) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक 15- माळीवाडा, पिंपळ चौक (1435) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक 16- जनता नगर परिसर (1502) नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 17- साबीर हट्टी भिलाटी, सावता नगर ( 1555) अनुसूचित जमाती (महिला)