शिंदखेडा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत

0

शिंदखेडा । येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समितीद्वारे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायाधीश प्रितेश भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील एकूण 736 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याद्वारे जवळपास 1 कोटी 23 लाख 49 हजार 227 रु.ची वसुली देखील झाली. याप्रसंगी न्यायालयाच्या आवारात एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती व्हावी म्हणून लोकअदालत जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर केले. दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे पुन्हा एकदा लोकअदालतीच्या माध्यमातून संधी मिळाल्याने तालुका विधी सेवा समितीमार्फत 58 वे लोकअदालत घेण्यात आली. त्यात दिवाणी व फौजदारी स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली.

न्यायाधीश प्रितेश भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पॅनलचे सदस्य बी.व्ही.सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते ए.डी.भामरे, सचिव बी.व्ही.सोनवणे, अशोकभाई गुजराथी, बी.झेड.मराठे, व्ही.ए.पवार, के.व्ही.भामरे, जितेंद्र बोरसे, अ‍ॅड.रितेश महिरे, श्रीमती एस.एम.मराठे, हर्षल अहिरराव, ए.एन.शेख, ए.सी.मंगासे, व्ही.एस.पाटील, पी.जी.पाटील आदी विधीतज्ञांनी सहकार्य केले. तालुक्यातील विविध दाखलपूर्व खटले विविध बँकांचे थकीत कर्ज प्रकरणे, करवसुली, दिवाणी व फौजदारी अशा प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 736 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 1 कोटी 24 लाख 49 हजार 227 एवढी वसुलीदेखील झाली.

याप्रसंगी एस.एस.व्ही.पी.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकअदालत जनजागृती हे पथनाट्य सादर केले. त्यास प्राचार्य डॉ.बी.आर.चौधरी, प्रा.एस.के.जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच लोकअदालतीस विविध बँकांसह डी.डी.सी.बँकेचे दिलीप चौधरी, महेंद्र पाटील, महेंद्र वेताळे, रविंद्र नगराळे आदी अधिकारी, करवसुली ग्रा.पं.नगरपंचायत, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मनिष पवार, वीज वितरण विभागाचे नगराळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. यासाठी न्यायालयाचे सहा अधिक्षक ईश्‍वर बारी, मेटकर, रितेश अलोणे यासह पो.कॉ. भूषण चौधरी, अनिल चौधरी, प्रशांत कुळकर्णी, अनिल देवरे यांनी परिश्रम घेतले.