शिंदखेडा। शासनाकडून विविध कामांसाठी दोन वर्षापासून कोणताही निधी मिळत नसल्याने पंचायत समिती गणामध्ये कोणतीही विकास कामे करता येत नाहीत. मतदार संघामध्ये मतदाराच्या विकासकामांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे पंचायत समितीला निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन सभापती सुनंदा नरेंद्र गिरासे यांनी पंचायतराज समिती सदस्यांना दिले.
निधीअभावी विकास खुंटला
पंचायत समितीतर्फे तालूक्यात विविध विकासकामे हाती घेतली जातात. यासाठी 2015 पर्यंत शासनाकडून सदस्यांना नियमित निधी मिळत होता. परंतू 2015पासून आजपर्यंत निधीच उपलब्ध झालेला नाही. पर्यायाने पंचायत समिती सदस्यांना आपल्या मतदार संघामध्ये कोणतीही विकासाची कामे करता येत नाहीत. निधीअभावी कामांना पूर्णपणे ब्रेक लागला आहे. गणामध्ये विकासकामांचा अनुषेश खूप आहे. विकास कामे होत नसल्याने पं.स.सदस्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अधिक विलंब न करता विकास ताक्ताळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सभापती सुनंदा गिरासे यांनी केली आहे.
पंचायत समिती बरखास्त करा
अठरा सदस्य असलेल्या पंचायत समितीची निवडणूक होवून साडेतीन वर्ष झालीत. मात्र या कालावधीत गणामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामूळे दिवसागणिक कामांचा अनुषेश वाढत आहे. त्यामुळे एकतर ताक्ताळ निधी उपलब्ध करून द्यावा अथवा पंचायत समितीच बरखास्त करावी अशी मागणी पं.स.सदस्य सतिष पाटिल व मनोहर देवरे यांनी एका निवेदनाव्दारे पंचातयराज समितीकडे केली आहे. सन 2015-16 ला पं.स.अंर्तगत समाज कल्याण विभागाकडून निकृष्ट दर्जाची ताडपत्री खरेदी करण्यात आली आहे. ताडपत्री अद्याप पडून आहे. निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार ,इंदिरा आवास घरकूल लाभार्थीची रक्कम हडपणे,सर्व शिक्षा अभियानांर्तगत वर्ग खोल्यांना दिले जाणारे अनूदान या बाबत चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.