शिंदखेडा पाणी योजनेचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0

शिंदखेडा। शहराच्या बहूचर्चीत कायमस्वरूपी पाणी योजनेचे भूमीपूजन 28 एप्रील रोजी रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकूमार रावल यांचे हस्ते करण्यात आले.येथील विरदेल रोड लगत साईलिला नगर मधे काल शुक्रवारी सायंकाळी सहाला हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर रात्री सातला येथील गांधी चौकात मंत्री रावल यांची जाहीर सभा झाली.पंधरा दिवसापूर्वी मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या योजनेचे ई भूमिपूजन केले होते. दि.22 एप्रिल रोजी या योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम होणार होता. मात्र डॉ .गिरासे यांच्या निधनामुळे कार्यक्रम होऊ शकला नाही.

गेल्या काही वर्षात शहराची पाणीटंचाई तिव्र झाली होती. परीणामी नागरीकांचे हाल होत होते. शहराला सूलवाडे बॅरेज येथून पाणी पूरवठा करणारी कायम स्वरूपी पाणी पूरवठा योजना असावी अशी गेल्या पंधरावर्षापूर्वीपासूनची मागणी होती. यात बरेच राजकारण झाले. या योजनेसाठी शहरातील दोघं राजकीय गट एकत्र आले. मंत्री रावल यांचेकडे या योजनेसाठी हट्ट धरला. रावल यांनीही यासाठी शासनाकडे पाठपूरावा करून योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळवून दिली. आता ही योजना मार्गी लागली आहे. 21 कोटी रूपये खर्चाची ही योजना असून त्यापैकी सहा कोटी 70 लाख रूपये चा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाले आहे. यापैकी एक कोटी साठ लाख रूपये लोकवर्गणी भरण्यात आली आहे. पूणे येथिल तेजस कन्सट्रक्शन यांना या कामाचा ठेका देण्यात आला आहे. येत्या जून पर्यंत शहरात पाणी पोहचेल आणि ऊर्वरीत पाईपलाईन आणि जलकूंभाचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. माजी प.स.सभापती प्रा सूरेश देसले, नगर पंचायत गटनेते अनिल वानखेडे, जि.प. सदस्य कामराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण बाजीराव पाटील,उपनगराध्यक्षा दिपक देसले , बांधकाम सभापती उपस्थित होते.