शिंदखेडा । शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनचा पटांगणात रमजान ईद निम्मिताने रोजा सोडण्याकरता ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवंरानी जातीय सलोखा राखून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला. यावेळी प्रमुख पाहुणे विभागीय पोलीस अधिकारी एल.एम. तडवी हजर होते. तर अध्यक्ष म्हणून नगरअध्यक्षा मथुराबाई मराठे उपस्थित होत्या.
विविध धर्मातील मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी मा.आमदार रामकृष्ण पाटील, मा. पं.स. सभापती सुरेश देसले, कॉँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष शामकांत सनेर, मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष राजू खाँ नवाज खाँ पठान, फरीद खाँ फत्ते खाँ, जलाल शेख रज्जाक, ईयाज भाई, शिवसेनेचे सर्जेराव पाटील, मा. पं.स. सदस्य प्रकाश चौधरी, पोलीस निरीक्षक भोज, नगरसेवक चंद्रकांत राजपूत, किरण चौधरी, युवराज माळी, जिल्हाबँकचे संचालक प्रकाश पाटील सह शहरातील मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी ईयाज भाई यांनी पोलीस निरीक्षक भोज यांना मराठी आवृत्ती कुरान भेट दिली. यशस्वीतेसाठी ए.पी.आय. चव्हाण, पी.एस.आय. प्रकाश पोतदार, व्ही.डी.पाटील, पो.हे.कॉ.केदार, प्रकाश पाटील, जाधव,दाभाडे, निबांडे, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले.