दोंडाईचा। राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी तब्बल 27.20 कोटीची कामे मंजूर झाली असून यातून सर्व प्रमुख रस्त्यांची कामे चकाचक होवून कामे झालेल्या रस्त्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी 2 वर्ष ठेकेदारांवर सोपविण्यात आली आहेत, त्यामुळे 2 वर्षापर्यंत शिंदखेडा मतदारसंघातील रस्ते आता चकाचक राहणार आहेत. ना.रावल यांनी ना. पाटील यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पाटील यांनी ना.रावल यांच्या 27 कोटी 20 लक्ष रूपयाच्या प्रस्तावाला मंजूरी देत अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करून त्यासाठी निधीची तरतूद केली आहे.
सावळदे, सुकवद शिंदखेडा दुसाणे साक्री रस्त्यावर कि.मी 48/00 ते 61/00 सतमाने फाटा ते दुसाणे या रस्त्यासाठी 3 कोटी, सुकवद ते चिमठाणे 5/00 ते 24/200 या रस्त्यासाठी 2 कोटी 91 लक्ष, चिमठाणे ते सतमाने या रस्त्यासाठी 2 कोटी 72 लक्ष, रामा 12 ते इंदवे रस्ता प्रजिमा 31 कि.मी. 00ते 5/00 या रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी 17 लक्ष, चिरणे होळ गोराणे, माळीच वालखेडा वाघाडी सोनगीर रस्त्यातील चिरणे, होळ, वाघोदे, वालखेडा, सोनगीर या रस्त्यासाठी 2 कोटी 86 लक्ष, निमगुळ, दाऊळ, बाम्हणे, विरदेल रस्त्यासाठी 10 ते 35/600 या लांबीत डांबरीकरण, मजबुतीकरण करणे या कामासाठी 2 कोटी 92 लक्ष, शिंदखेडा, वर्षी, कमखेडा, म्हळसर या रस्त्यासाठी 00 ते 23/350 या लांबीत रस्ता तयार करण्यासाठी 2 कोटी 86 लक्ष, दोंडाईचा मालपूर, कर्ले रस्त्यातील 00 ते 13/00 या लांबीसाठी 2 कोटी 97 लक्ष, शिंदखेडा चिरणे, कदाणे, महालपूर, खलाणे, वायपूर सार्वे या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी 75 लक्ष, या शिवाय शिंदखेडा चिरणे कदाणे रस्त्यावर शिंदखेडा गावाजवळ बुराई नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.